विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी सायंकाळी अमितेशकुमार यांच्या नावाचे बनावट एफबी अकाऊंट उघडण्यात आले. त्याद्वारे अमितेशकुमार यांच्या ओळखीच्या ३२ जणांना ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ पाठविण्यात आली. काहींनी ती ‘अॅक्सेप्ट’ केली. दरम्यान आधीच ‘फेसबुक फ्रेण्ड’ असताना पुन्हा ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ आल्याने त्यांच्या काही मित्रांनी अमितेशकुमार यांच्याशी थेट संपर्क साधला.आपण कोणत्याही प्रकारची ’फ्रेण्ड रिक्वेस्ट’ पाठविली नसल्याचे अमितेशकुमार यांनी त्यांना सांगितले. हा बनावटपणा उघडकीस येताच अमितेशकुमार यांनी लगेच सायबर सेलला याबाबत कळविले. बनावट अकाऊंट तयार करणाऱ्यांचा शोध घेण्याचे निर्देश दिले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलण्याचे टाळले. उशिरारात्रीपर्यंत या बनावट फेसवुक अकाऊंटबाबत पोलिस दलात मात्र चर्चा सुरू होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times