सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग ही अनपेक्षित घटना आहे. ही घटना दुर्दैवी आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबांबद्दल संवेदना व्यक्त करतो. तसंच या घटनेत जखमी झालेल्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना, असं ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.
दरम्यान, आगीच्या या घटनेमागे घातपात तर नाही ना? असा संशय विरोधकांनी व्यक्त केला होता. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलंय. आग लागलेल्या इमारतीत बांधकाम सुरू होतं. त्यातूनच इलेक्ट्रिक बिघाडामुळं आग लागली, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
देशात सध्या करोनावरील लसीकरण मोहीम सुरू आहे. सीरम इन्स्टिट्यूची कोविशिल्ड लसचे डोस लाभार्थ्यांना दिले जात आहेत. भारताच्या या कोविशिल्ड लसला अनेक देशांतून मागणी आहे. भारताची ही कोविशिल्ड लस प्रभावी आहे आणि तिचे साइड इफेक्टही फारसे नाहीत. यामुळे अनेक देशांनी या लसीची मागणी केली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times