पुणे: पुण्यातील मांजरी येथील मधील निर्माणाधीन इमारतीत लागलेल्या आगीत पाच कंत्राटी मजुरांचा होरपळून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून या घटनेवर तीव्र शोक व्यक्त करत सीरमचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी एक महत्त्वाचं निवेदन जारी केलं आहे. दरम्यान, आग आटोक्यात आल्यानंतर ज्या मजल्यावर सर्वप्रथम आग लागली होती तिथेच एका खोलीत पुन्हा आग लागली असून ती काही वेळातच आटोक्यात आणली गेली आहे. ( Cyrus Poonawalla on )

वाचा:

सीरम इन्स्टिट्युटमध्ये सहा मजली नवीन इमारतीचे काम सुरू असून याच इमारतीत आज दुपारी आगीचा भडका उडाला. या आगीवर चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सुरुवातीला या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे सांगण्यात येत होते. मात्र आग आटोक्यात आल्यानंतर अग्निशमन जवानांनी केलेल्या पाहणीत शेवटच्या मजल्यावर पाच मृतदेह आढळून आले आहेत. या पाचही जणांची ओळख पटली असून हे सर्व जण कंत्राटी मजूर होते. साइटवर इलेक्ट्रिकल काम ते करत होते, असे स्पष्ट झाले आहे. रामाशंकर हरिजन, बिपीन सरोज (दोघेही उत्तर प्रदेशातील), सुशीलकुमार पांडे (बिहार), महेंद्र इंगळे आणि प्रतिक पाष्टे (दोघेही पुण्यातील) अशी मृतांची नावे आहेत.

वाचा:

सीरमचे सायरस एस. पुनावाला यांनी एक निवेदन जारी करून या संपूर्ण घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. सीरमसाठी आजचा दिवस अत्यंत वेदनादायी आहे. आमच्या नवीन निर्माणाधीन इमारतीत लागलेल्या आगीत पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. या सर्वांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, अशा शोकभावना व्यक्त करत पुनावाला यांनी या पाचही कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. नियमानुसार या कुटुंबांना जी रक्कम मिळायची आहे ती मिळेलच मात्र, आम्ही प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत या पाचही मृतांच्या कुटुंबीयांना देत आहोत, असे पुनावाला यांनी जाहीर केले.

दरम्यान, सीरममधील आग दुर्घटनेचा संपूर्ण तपशील मुख्यमंत्री यांनी घेतला आहे व आवश्यकत्या सर्व सूचना दिल्या आहेत. सीरमचे सीईओ यांच्याशीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी चर्चा केली असून उद्या शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता मुख्यमंत्री दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here