म. टा. प्रतिनिधी, मुंबई

घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे धावणाऱ्या मुंबईकरांचा थकवा दूर करण्यासाठी रेल्वे स्थानकांतच काही आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मुंबई सेंट्रलसह सहा सुरू करण्याचा निर्णय ने घेतला आहे. महिला आणि पुरुष दोघांनाही या सुविधेचा वापर करता येणार आहे.

रेल्वे स्थानकातील मोकळ्या जागेचा वापर प्रवाशांच्या दैनंदिन आयुष्यातील गरजा भागवण्यासाठी करण्याकरिता हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रेल्वे स्थानकातील प्रवासी वर्दळीला अडचण ठरणार नाही, अशा ठिकाणी हे सलून उभारण्यात येणार आहेत, असे पश्चिम रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाचा:

अंधेरी रेल्वे स्थानकात दोन आणि मुंबई सेंट्रल, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली आणि सुरत या रेल्वे स्थानकांत प्रत्येकी एक अशी सलून उभारण्यात येणार आहेत. सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत सलूनचा लाभ प्रवाशांना घेता येईल. शुल्क भरण्यासाठी डिजिटल पर्यायही प्रवाशांना येथे उपलब्ध होईल.

वातानुकूलित सलूनमध्ये डोक्याची मालिश, चेहऱ्याची मालिश यांसह सामान्य केशकर्तनालयातील सर्व सुविधा प्रवाशांना माफक दरात उपलब्ध करून देण्यात येतील. सलूनसाठी निवडक रेल्वे स्थानकांतील प्रत्येकी २५६ चौरस फूट इतकी जागा भाडेतत्त्वाने देण्यात येणार आहे. पाच वर्षांसाठी हा करार असणार आहे. या जागेचा देखभाल खर्च हा संबंधितालाच करणे बंधनकारक राहणार आहे.

नियमभंग केल्यास दंड

कंत्राटदाराने नियमांचे उल्लंघन केल्यास किंबहूना प्रवाशांकडून कोणत्याही प्रकारची तक्रार आल्यास कंत्राटदारांला १० हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकातील प्रत्येक सलूनमध्ये तक्रारवही असणे बंधनकारक करण्यात आले आहे, असे पश्चिम रेल्वेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

वाचा:

पश्चिम रेल्वेरील सहा स्थानकांवरील एकूण सात ठिकाणी वातानुकूलित सलून उभारण्यात येणार आहे. यासाठी पश्चिम रेल्वेकडून स्वारस्याची अभिव्यक्ती (ईओआय) मागवण्यात आली आहे.

-सुमीत ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here