वाचा:
‘राजकारणात अनेक वर्षे काम करणाऱ्या प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल. मात्र, आमच्या पक्षाकडं सध्या संख्याबळ नाही. शिवाय, त्याबाबतचा अंतिम निर्णय हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच घेतात,’ असं मत जयंत पाटील यांनी दोन दिवसापूर्वी सांगलीतील एका स्थानिक न्यूज चॅनेलशी बोलताना व्यक्त केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात टीका-टिप्पणी सुरू झाली होती. भाजपच्या अनेक नेत्यांनी टोलेबाजी सुरू केली होती.
कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या शरद पवारांना यांनाही याबाबत विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, एखाद्या नेत्याने मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यामध्ये गैर काय ? प्रत्येकालाच मुख्यमंत्री व्हावे असे वाटत असते. आता मलाही मुख्यमंत्री व्हावसं वाटतंय… पण सध्या संधी दिसत नाही असा टोलाही त्यांनी मारला.
दादांचा पाठिंबा असेल तर…
खासदार सुप्रिया सुळे यांनाही पत्रकारांनी मुख्यमंत्रिपदाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, जयंत पाटील हे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून अजित पवारांचा पाठिंबा असेल तर आमचा पाठिंबा नसण्याचे कारणच नाही. आपल्या पक्षाचा, आपल्या विचाराचा मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा असण्यात गैय काय असा सवालही त्यांनी केला.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times