मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात नदीजवळ पाच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली. गुरुवारी पोलिसांनी ही माहिती दिली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३५ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा मजुरी करतो. मुलीच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या शेतावर तो काम करत होता.
आरोपीने बुधवारी दुपारी मुलीला नदीजवळच्या परिसरात नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचा गळा आवळून हत्या केली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली असून, मुलीचा मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या पित्याने तिला दुपारी दोन वाजताच्या सुमारास आरोपीसोबत बघितले होते. त्यानंतर पाच वाजता मुलगी कुठेही दिसली नाही. तिचा शोध घेऊनही ती सापडली नाही. अखेर पित्याने आणि कुटुंबीयांनी स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times