सांगली: जिल्ह्यातील तालुक्यात येथे खळबळजनक घटना घडली. बेपत्ता झालेल्या विवाहित तरुणीचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी विहिरीत आढळून आला. एकतर्फी प्रेमातून तरुणाने तिचा विहिरीत ढकलून केल्याचे उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकतर्फी प्रेमातून एका विवाहित तरुणीची विहिरीत ढकलून करण्यात आल्याची घटना शिराळा तालुक्यातील देववाडी येथे घडली. रुपाली खोत असे ३२ वर्षीय मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे.
निवास खोत असे संशयित आरोपीचे नाव असून, घटनेनंतर तो फरार झाला आहे. काल, गुरुवारी संध्याकाळी ही विविहिता बेपत्ता झाली होती. आज, सकाळी या तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळून आला. एकतर्फी प्रेमातून तरुणाने तिला विहिरीत ढकलले, अशी माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times