गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. महापालिका निवडणुका जवळ येत असतानाच नगरसेवक पक्षांतर करत असल्याच्या चर्चेनं राजकारणही तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे.
‘वारं बदलतं तसं काहीजण बदलत असतात, मागे आमचं सरकार गेल्यांतर आमच्यातले काही जण भाजपमध्ये गेले. पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना पक्षनिष्ठा वगैरे काहीही नसतं, त्यांच्यात कदाचित एक ध्येय असतं आपल्या प्रभागाचा व गटाचा विकास व्हावा. पण कामं कशी होणार तर सत्ताधारी पक्षातून निवडून आलं तरच कामं होतील. म्हणून जर त्यावेळी गेले असतील आणि आता जर वेगळा विचार करुन परतत असतील तर त्यांचा स्वार्थ नाही कारण फक्त विकास,’ असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.
मुंडे कुटुंबाला त्रास झाला
‘एखादा राजकीय व्यक्ती सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्यांच नाव लोकांच्या मध्ये चांगलं होण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. पण असा कोणी आरोप केला तर एका झटक्यात त्याची बदनामी होतात. विरोधक हा मुद्दा हाताशी ठेवतात. राजीनामाच्या मागणी होती. ज्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनामाच्या मागणी केली, ते काय उत्तर देणार,’ असा सवाल त्यांनी अजित पवारांनी केला आहे.
‘आरोपांमुळं कुटुंब अडचणीत आलं. घरातल्या वडिलधाऱ्यांना त्रास झाला, याला कोणी वाली आहे नाही. यात पक्षाचीही बदनामी झाली,’ असंही ते म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times