वाचा:
शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्तानं सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली. राज्य सरकारनं काही नेत्यांची सुरक्षा काढून घेतल्यानंतर केंद्राने त्यांना सुरक्षा देऊ केली आहे. केंद्राच्या या भूमिकेवर त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. ‘मुळात सुरक्षा देण्याची गरज आहे का? संभाव्य धोका किती आहे?, याचा आधी अभ्यास करायला हवा. तो अभ्यास करूनच कदाचित राज्य सरकारनं काही नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली असेल. पण राज्य सरकारच्या या निर्णयानंतर केंद्रानं काही नेत्यांना सुरक्षा पुरवणं म्हणजे राज्याच्या अधिकारात हस्तक्षेप आहे, असं ते म्हणाले. ‘काही नेत्यांना केवळ मिरवण्यासाठी सुरक्षा लागते, असा टोलाही त्यांनी हाणला.
सरकारची पावले मराठा आरक्षणाच्या दिशेनेच!
‘मराठा आरक्षण मिळावे ही राज्य सरकारची भूमिका आहे. त्याच दिशेनं सरकारची पावलं पडत आहेत. खोटे आरोप करून राज्य सरकार अस्थिर करण्याचं षडयंत्र चाललं आहे. मात्र, हे सरकार भक्कम आहे. ते पाच वर्षे नक्की टिकेल. खोट्या आरोपांचा सरकारवर काहीही परिणाम होणार नाही,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times