जळगाव: गेल्या काही दिवसांपासून प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हिंदू धर्म व संस्कृतीची जाणीवपूर्वक टिंगल-टवाळी करण्याचे प्रकार सुरू आहेत. असले प्रकार यापुढे खपवून घेणार नसल्याचा इशारा हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी आज येथे दिला.

वाचा:

जळगावातील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. धनंजय देसाई पुढे म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवरून ज्या वेबसीरीज व कार्यक्रम प्रसारित होत आहेत, त्यातून हिंदू देव-देवता तसेच भारतीय संस्कृतीची जाणीवपूर्वक विटंबना केली जात आहे. ज्याप्रमाणे बॉलिवूडच्या माध्यमातून जिहादी मानसिकता व्यक्त होत होती. तीच आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरून व्यक्त होत आहे. सध्या ” या वेबसीरीजमध्ये ( WebSeries) देखील असाच प्रकार घडला आहे. तो खपवून घेतला जाणार नाही, असे प्रकार होत असतील तर त्यावर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी हिंदू राष्ट्र सेनेची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. देशद्रोही मानसिकता नेस्तनाबूत करण्यासाठी राष्ट्रभक्त नागरिकांनी संघटित होणे आवश्यक आहे. राष्ट्रभक्त नागरिकांना संघटित करणे हे हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे देखील धनंजय देसाई यांनी यावेळी सांगितले.

देशद्रोही आंदोलने थांबवायला हवीत!

अलीकडच्या काळात आपल्या देशात देशद्रोही आंदोलनांचे पेव फुटले आहे. हे उखडून फेकायला हवे. देशद्रोही शक्ती मग त्या देशातील असो अथवा बाहेरील, त्यांचा उद्देश एकच असतो; तो म्हणजे भारतात अराजक पसरवायचे. त्यासाठी सातत्याने विविध आंदोलनांचे बुरखे घालून या शक्ती देशाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करतात, असेही धनंजय देसाई यांनी यावेळी सांगितले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here