बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळं प्रदेशाध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षानं महाराष्ट्रातील काही नेत्यांना संधी देण्याचं ठरवलं आहे. यात विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव चर्चेत आहे. मात्र, पदभार स्विकारण्यापूर्वीच नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे.
विधानसभेच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत आघाडी करत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यांनंतर विविध मुद्द्यांवरुन आघाडीतली मतभेद समोर आले होते. मात्र, तरीही आघाडीतील नेत्यांकडून सरकार भक्कम असल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान, नाना पटोले यांनी राज्यात स्वबळावर पक्ष सत्तेत येईल, असं वक्तव्य करत चर्चेला तोंड फोडलं आहे.
‘आमच्या पक्षात जे काही संघटनात्मक निर्णय घेण्याचे अधिकार आहेत ते राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आहेत. जी जबाबदारी मिळेल ती प्रामाणिकपणे पार पाडणार पक्ष बळकट करण्यासाठी आणि पक्ष स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्राला पुन्हा वैभव मिळवून देण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल,’ असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
औरंगाबाद नामांतरावरुन वादाची ठिणगी
औरंगाबद शहराच्या नामांतरावरुन काँग्रेसनं विरोधाची भूमिका घेतली होती. तर, सत्ताधारी शिवसेनेनं नामांतरासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. त्यामुळं दोन्ही पक्षांतील नेत्यांनी एकमेंकाविरुद्धची नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times