सुरूच रहावं यासाठी काही छुपे प्रयत्न सुरू आहे. यामुळेच सरकार आणि शेतकरी संघटनांच्या बैठकीत कुठलाही निर्णय होत नाहीए. तरीही शेतकऱ्यांच्या आणि देशाच्या हितासाठी आम्ही दिलेल्या प्रस्तावाचा संघटनांनी विचार करावा. आपला निर्णय शेतकरी संघटनांनी शनिवारपर्यंत द्यावा, असं नरेंद्र सिंह तोमर म्हणाले.
आजची बैठक निष्फळ ठरली. कारण शेतकऱ्यांच्या हिताचा नेत्यांच्या हृदयात नाहीत. यामुळे खेद वाटतो. शेतकरी संघटना कायदे रद्द करण्यावर ठाम आहेत. पण सरकार त्यांच्याकडे याशिवाय पर्याय सादर करण्यास सांगत आहे, असं तोमर यांनी स्पष्ट केलं.
शेतकरी संघटनांनी शनिवारपर्यंत आपला प्रस्ताव सादर करावा. शेतकरी सहमत असतील, तर आम्ही पुन्हा भेटू, असं कृषीमंत्री तोमर यांनी शेतकरी संघटनांना सांगितल्याचं वृत्त ‘पीटीआय’ने दिलं आहे.
सरकार आणि शेतकरी संघटनांमधील आजची बैठक संपली. पण सरकारने पुढील बैठकीची तारीख निश्चित केलेली नाही, अशी माहिती बैठक संपल्यानंतर बीकेयू क्रांतिकारक (पंजाब) संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरजितसिंग फूल यांनी दिली.
शांततेत आंदोलन सुरूच राहील
मंत्र्यांनीआम्हाला साडेतीन तास बसवून ठेवलं. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. मंत्री आले तेव्हा त्यांनी आम्हाला सरकारच्या प्रस्तावावर विचार करण्यास सांगितलं. आणि बैठकीची प्रक्रिया संपुष्टात आली. आमचं आंदोलन शांततेत सुरूच राहील, असं किसान मजदूर संघर्ष समितीशी संबंधित एस. एस. पंढर म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times