पुणेः सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीबाबत चौकशी केली जात आहे. त्यानंतरच हा अपघात होता की घातपात हे स्पष्ट होईल, त्याआधी कोणताही निष्कर्ष काढणे योग्य राहणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी सीरमच्या घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

करोना संकट काळात सीरम इन्स्टिट्यूट आशेचा किरण होती. त्यामुळे सीरमला आग लागल्याचं कळताच काळजाचा ठोका चुकला. मात्र, सुदैवाने जिथे करोनाची लस तयार केली जाते ते केंद्र इथून अंतरावर आहे आणि तिथे कोणतीही दुर्घटना घडली नाही किंवा त्याचा फटका बसलेला नाही. करोना लसीचा साठा पूर्णपणे सुरक्षित आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

वाचाः

सीरमच्या या नव्या इमारतीतील दोन मजले वापरात होते. तिथे नवीन केंद्र सुरू करण्यात येणार होतं. तिथेच ही दुर्घटना घडली, असंही त्यांनी सांगितलं आहे.

वाचा:

‘आगीबद्दल चौकशी केली जात आहे. म्हणून मला असं वाटतं की अहवाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे योग्य राहणार नाही, असं नमूद करतानाच ज्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे, त्यांची पूर्ण जबाबदारी कंपनीने घेतली आहे. परंतु त्याव्यतिरिक्त आणखी काही करण्याची आवश्यकता असेल तर सरकार जरूर करेल,’ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

दरम्यान, पत्रकार परिषदेत सीरमचे सीईओ अदर पूनावालादेखील उपस्थित होते. आगीत एक हजार कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. तसंच, बीसीजीसह इतर औषधांच्या साठ्यावर परिणाम झाला असून महत्त्वाच्या साहित्यांचं नुकसान झालं आहे, असं पुनावाला यांनी सांगितलं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here