मुंबईः आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या येथून करोनाबाबत खूप मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी करोनानं थैमान घातलेल्या धारावीक आज करोनाचा एकही नवा रुग्ण सापडला नाही. ()

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वंयशिस्त आणि सामुहिक प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. करोनावर यशस्वीपणे नियंत्रण मिळवणाऱ्या धारावी पॅटर्नचं जगभरात कौतुक होतं होतं. आज धारावीत फक्त १० अॅक्टिव्ह रुग्ण उरले आहेत.

धारावातील करोनाचा प्रादुर्भाव रोखणे आव्हानात्मक काम होते. हे आव्हान स्थानिक धारावीकर, महापालिका प्रशासन आणि स्वंयसेवी संस्थांनी स्वीकारले. अशावेळी चेस द व्हायरस ” उपक्रमातून ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटींगची संकल्पना चार पातळीवर वेगाने राबविण्यात आली. आज ही संकल्पाना यशस्वी ठरल्याचे पाहायला मिळतंय. गेल्या महिन्यात धारावीत शून्य करोना रुग्ण आढळले होते. त्यानंतर तब्बल महिना भरात धारावीत एक- दोन अशा संख्येनं रुग्ण आढळत होती. आज तब्बल महिनाभरानंतर धारावीनं पुन्हा शून्य करोना दिवस अनुभवला आहे.

धारावीत सध्या १० करोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण उरले आहेत. तर, धारावीतील करोना रुग्णांची संख्या ३ हजार ९०४ इतकी आहे. तर, आत्तापर्यंत ३ हजार ५८२ इतके रुग्ण बरे झाले आहेत.

दादर, माहिम भागातही दिलासा कायम
धारावी लगतच्या माहीम आणि दादर भागातही गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. दादरमध्ये आज ०२ रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या ४९०० इतकी झाली आहे. तर, आजपर्यंत ४ हजार ६४५ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर, आत्तापर्यंत ८२ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. माहिममध्येही आज फक्त ३ करोना रुग्ण सापडले असून सध्या १०१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here