मुंबई: राज्यात आज ५० बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात २ हजार ७७९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ३ हजार ४१९ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. राज्याचा वाढून ९५.१७ टक्के झाला असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ४५ हजारांच्या खाली आली आहे. राज्यासाठी हा खूप मोठा दिलासा मानला जात आहे. ( Update )

वाचा:

राज्यात कोविड लसीकरणाला वेग आला आहे. पहिल्या टप्प्यात करोना साथीत आघाडीवर लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. या लसद्वारे एकीकडे करोनाला ब्रेक लावला जात असताना दुसरीकडे करोना साथीचे दैनंदिन आकडेही खूप दिलासा देत आहेत. राज्यातील करोना रुग्णांचे प्रमाण वेगाने घटत असून रिकव्हरी रेट सातत्याने वाढताना दिसत आहे. करोना मृत्यूंचा आकडाही गेल्या काही दिवसांपासून कमी झाला आहे.

वाचा:

राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या आजच्या आकडेवारीनुसार राज्यात करोनाने आणखी ५० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ५० हजार ६८४ इतकी झाली असून राज्यातील आता २.५३ टक्के इतका झाला आहे. राज्यात गेल्या २४ तासांत २ हजार ७७९ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर त्याचवेळी ३ हजार ४१९ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १९ लाख ६ हजार ८२७ करोना बाधित रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.१७ टक्के इतके झाले आहे. राज्यात तपासण्यात आलेल्या एकूण १ कोटी ४० लाख ८० हजार ९३० प्रयोगशाळा नमुम्यांपैकी २० लाख ०३ हजार ६५७ (१४.२३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख १३ हजार ४१४ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २ हजार १९ व्यक्ती सांस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

वाचा:

राज्यात ४४ हजार ९२६ अॅक्टिव्ह रुग्ण

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा वेगाने खाली येत आहे. सध्या राज्यात ४४ हजार ९२६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक १२ हजार ९२६ रुग्ण जिल्ह्यात आहेत तर ठाणे जिल्ह्यात ७ हजार ८०८ आणि पालिका हद्दीत ६ हजार ४४२ रुग्ण उपचार घेत आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here