नवी दिल्ली : सध्याच्या घडीला विराट कोहलीकडे दिलेल्या कर्णधारपदाबाबत चांगलाच वाद सुरु आहे. आता भारताचा माजी सलामीवीर आणि खासदार गौतम गंभीरनेही कोहलीवर सणसणीत टीका केली आहे.

अजिंक्यच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियात तिरंगा फडकवला. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विराट कोहलीकडे कर्णधारपद देण्यात आले. यानंतर बऱ्याच जणांनी या निर्णयावर टीका केली. भारताचे कसोटी कर्णधारपद अजिंक्यकडेच राहायला हवे, असे बऱ्याच जणांनी म्हटले आहे. गंभीरनेही यावेळी कोहलीच्या नेतृत्वावर टीका केली आहे. पण गंभीरने आयपीएलमधील त्याच्या कर्णधारपदावर टीका केली आहे. कारण गेल्या आठ वर्षांपासून कोहलीकडे आरसीबीच्या संघाचे नेतृत्व आहे, पण या आठ वर्षांमध्ये एकदाही आरसीबीच्या संघाला जेतेपद पटकावता आलेले नाही.

गंभीरने एका कार्यक्रमात सांगितले की, ” गेल्या आठ वर्षांपासून विराट कोहलीकडे आयपीएलमधील आरसीबीच्या संघाचे नेतृत्व आहे. पण गेल्या आठ वर्षांत आरसीबीच्या संघाला कोहलीच्या नेतृत्वाखाली एकही जेतेपद पटकावता आलेले नाही. आठ वर्षे हा फार मोठा कालखंड असतो. तुम्हीच अशा एका कर्णधार किंवा खेळाडूचे नाव सांगा, ज्याने गेल्या आठ वर्षांत एकदाही आयपीएलच्या जेतेपदाची चव चाखलेली नाही. पण कोहलीला ही गोष्ट करायला अजूनही जमलेले नाही.”

गंभीर पुढे म्हणाला की, ” जर तब्बल आठ वर्षे एका संघाला एकदाही जेतेपद पटकावता येत नसेल तर ते कर्णधाराचे अपयश आहे, असे मला तरी वाटते. कोहलीने एक कर्णधार म्हणून पुढे यायला हवे आणि या गोष्टीला मीच जबाबदार आहे, हे सांगायला हवे. कर्णधार असताना तुम्हाला काही गोष्टींचा स्विकार करावा लागतो, कोहलीनेदेखील कर्णधार असताना या गोष्टींचा स्विकार करायला हवा, असे मला तरी वाटते.”

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here