नगर: ज्येष्ठ समाजसेवक यांनी ३० जानेवारीपासून उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांचे पत्र घेऊन विरोधी पक्षनेते राळेगणसिद्धीत आले होते. तब्बल तासभर चर्चा झाली. मात्र, ठोस कारवाईशिवाय माघार नाही, असे सांगून अण्णा हजारे यांनी निर्णय बदलण्यास नकार दिला. त्यामुळे फडणवीसांसह चर्चेसाठी आलेल्या नेत्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. हजारे यांचे मुद्दे केंद्र सरकारला कळवून पुन्हा चर्चा करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. ( )

वाचा:

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हजारे यांनी ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धीमध्ये उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यांचे उपोषण थांबविण्यासाठी भाजपचे गेल्या काही दिवासांपासूनच प्रयत्न सुरू आहेत. काल हजारे यांनी तारीख आणि ठिकाणही जाहीर केले. त्यामुळे आज फडणवीस यांनी त्यांना भेटण्यासाठी येत असल्याचा निरोप पाठविला. ठोस उपाय असेल तरच या असे हजारे यांच्याकडून त्यांना कळविण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ज्येष्ठ नेते राळेगणसिद्धीत पोहचले. त्यांच्या पाठोपाठ फडणवीस आणि माजी मंत्री दाखल झाले. त्यांच्यामध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. मात्र, यातून तोडगा निघू शकला नाही.

वाचा:

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘अण्णा हजारे यांचे सर्व मुद्दे ऐकून घेतले. त्यांना सरकारने पूर्वी दिलेल्या आश्वासनांवर चर्चा झाली. त्यातील काय काय पूर्तता झाली, भविष्यात काय निर्णय अपेक्षित आहेत, यावर चर्चा झाली. हे सर्व मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळविण्यात येणार आहेत. हजारे हे देशाचे भूषण आहेत. त्यांचे उपोषण होऊ नये, यासाठी अटोकाट प्रयत्न करणार आहोत. अण्णा हे मोठे व्यक्तिमत्व आहे. त्यांना केवळ तुमचे पत्र मिळाले, असे उत्तर देऊन चालत नाही. विचारपूर्वकच उत्तर द्यावे लागते, त्यामुळे त्यांच्या पत्राला उत्तर देताना उशीर होतो, असेही फडणवीस यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. चर्चा सकारात्नक झाली असून केंद्र सरकारचे मार्गदर्शन घेऊन पुढील फेरी होईल व उपोषणाची वेळ येणार नाही, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

वाचा:

फडणवीस यांच्यानंतर अण्णा हजारे यांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘केंद्रीय कृषिमंत्र्यांचा पत्र घेऊन फडणवीस आणि त्यांचे सहकारी आले होते. त्या पत्रावर चर्चा झाली. मात्र, ठोस निर्णयांबद्दल काहीही सांगता आले नाही. त्यामुळे ही चर्चा पुरेशी नाही. त्यामुळे आपण ३० जानेवारीपासून उपोषण करण्यावर ठाम आहोत. सुमारे दोन वर्षांपूर्वी हजारे यांनी लोकायुक्त आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राळेगणसिद्धीतच उपोषण केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री असलेले फडणवीस मोठ्या लवाजम्यासह आले होते. त्यावेळी तब्बल सहा तास चर्चा झाली आणि तोडगा निघून उपोषण मिटले होते. यावेळी मात्र त्यांना यश आले असून चर्चेच्या फेऱ्या सुरूच राहणार आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here