गुरुग्राम: हरयाणातील गुरुग्राममध्ये करोनावरील लस घेतल्यानंतर ( ) आरोग्य कर्मचार्‍याचा मृत्यू झाला आहे. पण या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू करोनावरील लस घेतल्याने झाला की इतर कुठल्या कारणाने हे स्पष्ट झालेलं नाही. पण या महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी करोना लसीबाबत तक्रार दाखल केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्याच्या मृत्यूची चौकशी सुरू आहे. पोस्टमार्टम अहवालातून काहीही स्पष्ट झालेले नाही, असं गुरुग्रामचे सीएमओ म्हणाले.

हरयाणामधील गुरुग्राम जिल्ह्यातील भांगरौला प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत ५५ वर्षीय राजवंती यांना १६ जानेवारीला लस देण्यात आली होती. राजवंतीच्या कुटुंबीयांनी त्यांच्या अकस्मात मृत्यूची माहिती शुक्रवारी दिली. पण मृत्यू करोनावरील लसीकरणामुळे झाल्याचा कुठलाही पुरावा नाहीए, असं सीएमओ वीरेंदर यादव म्हणाले.

कुटुंबीयांनी लसीला धरले जबाबदार

राजवंती यांचा मृत्यू कृष्णा नगर कॉलनी येथील त्यांच्या राहत्या झाला. राजवंती यांच्या मृत्यूची चौकशी केली जात आहे. चाचणीसाठी व्हिसेराचे नमुने पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतरच योग्य ते कारण स्पष्ट होईल, असं सीएमओ म्हणाले. पण मृत महिलेच्या कुटुंबीयांनी करोनावरील लसला जबाबदार धरलं आहे. मृताच्या कुटुंबीयांनी करोना लसीकरणविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याचं मीडिया रिपोर्टमधून सांगण्यात आलं आहे. त्वरित थांबवावं, असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

आरोग्य कर्मचार्‍यांना १६ जानेवारीपासून देशभरात करोनावरील लस दिली जात आहे. लसीकरणानंतर काहींवर साइड इफेक्ट झाल्याचं समोर आलं आहे. पण बर्‍याच जणांना एलर्जी आणि भीतीची समस्या असल्याची नोंद झाली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here