पुणे: महाराष्ट्रात करोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला होता. तेव्हापासून करोनाच्या विळख्यात सापडलेलं पुणे शहर अजूनही या साथीतून पूर्णपणे सावरलेलं नाही. मात्र, नेहमीच निर्णयांच्या बाबतीत एक पाऊल पुढे राहणाऱ्या पुण्याने आज बाबत खूप मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. याबाबत महापौर यांनी घोषणा केली आहे. ( )

वाचा:

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या वेगाने घटताना दिसत आहे. त्यासोबतच पुण्यातील करोना मृत्यूंचे प्रमाणही कमी झाले आहे. पुणे पालिका हद्दीत गेल्या २४ तासांत करोनाचे २३४ नवीन रुग्ण आढळले आहेत तर करोनाने एक रुग्ण दगावला आहे. पालिका क्षेत्रात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ४ हजार ४६७ इतका खाली आला आहे. ही खूपच दिलासा देणारी बाब असून त्यातूनच पुणेकरांवरील निर्बंध एकेक करून सैल केले जात आहेत. मिशन बिगिन अगेन अंतर्गत पुण्यातील अनेक व्यवहार आधीच सुरू झालेले आहेत. विशेष म्हणजे नवं वर्ष उजाडायच्या आधीच ३१ डिसेंबर रोजी पुणे शहर कंटेन्मेंटच्या जोखाडातून मुक्त झालं होतं. या दिलाशानंतर आज महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आणखी एक सुखद धक्का पुणेकरांना दिला आहे.

वाचा:

पुणे पालिकेने मास्कसक्तीबाबत अत्यंत महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. शहरात एखादं कुटुंबं त्यांच्या स्वत:च्या कारमधून फिरत असेल तर त्यांना आता मास्कची सक्ती असणार नाही, असे महापौर मोहोळ यांनी जाहीर केले आहे. मास्कसक्तीतून दिली जाणारी ही सवलत मर्यादित असेल. प्रवासी वाहतूक करणारी वाहने (ओला, उबर कॅब) तसेच दुचाकीवरून तुम्ही जात असाल तर मात्र तुम्हाला वापरणं बंधनकारक असेल, असेही मोहोळ यांनी पुढे स्पष्ट केले.

दरम्यान, करोना साथ आल्यापासून प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर मास्क आलेला आहे. आता करोनाचा जोर ओसरत असताना पुण्यात मास्कसक्तीतून मर्यादित स्वरूपात सवलत दिली गेल्याने या निर्णयाची बरीच चर्चा होण्याची शक्यता आहे. याची कशाप्रकारे अंमलबजावणी होणार, पुणे पालिका त्यावर कशाप्रकारे लक्ष ठेवणार, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

वाचा:

पुणे पालिकेचा आदेश नेमका काय आहे?

खासगी वाहनामध्ये वाहन चालकासह सर्व व्यक्ती एकाच कुटुंबातील असणे आवश्यक आहे. कुटुंबातील व्यक्तीसोबत अन्य वाहनचालक अथवा अन्य व्यक्ती एकत्रित प्रवास करत असल्यास मास्कचा वापर बंधनकारक राहणार आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले असून क्षेत्रापुरताच हा आदेश लागू असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. हा आदेश महापौर मोहोळ यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरही पोस्ट केला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here