मराठवाड्याच्या पाणीप्रश्नी भाजप व गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाणतर्फे विभागीय आयुक्तालयासमोर सोमवारी पंकजा मुंडे यांनी लाक्षणिक उपोषण केले. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, रासप नेते महादेव जानकर यांच्याबरोबर फडणवीस उपोषणस्थळी आले होते. फडणवीस यांचं भाषणही यावेळी झालं. आपल्या भाषणातून त्यांनी मराठवाड्याच्या नुकसान करू नका, असा इशाराही सत्ताधाऱ्यांना दिला. मात्र, चर्चा आहे ती बूट हातात घेऊन उभ्या असलेल्या फडणवीसांच्या फोटोची.
वाचा: ‘
‘
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हा फोटो त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून शेअर केला आहे. हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यावरून राष्ट्रवादीनं फडणवीसांवर खोचक टीकाही केली आहे. फडणवीस हे गेली पाच वर्षे राज्याच्या वेगवान विकासाबद्दल घसा ताणून सांगत होते. महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे हे ढोल बडवून सांगत होते. तेच फडणवीस आता आंदोलनात सहभागी होत आहेत. पण आंदोलनस्थळी असलेल्या आपल्याच लोकांवर त्यांचा विश्वास नाही. आपण चोरांच्या टोळीत बसलोय की काय असं त्यांना वाटत असावं. त्यामुळंच बूट हातात घेऊन त्यांनी भाषण केलं, असं चाकणकर यांनी म्हटलंय.
वाचा:
फडणवीस हे विरोधात आहे हे मान्य आहे. पण महाविकास आघाडीच्या सरकारला सत्तेत येऊन जेमतेम महिना झाला असताना कामाचा हिशेब मागत आहेत. आधी पाच वर्षांतील तुमच्या सत्तेतील हिशोब द्या, असं चाकणकर यांनी सुनावलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times