म. टा. प्रतिनिधी, नागपूर: जेवणावरून झालेल्या वादातून . ही घटना गुरुवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचशील कॉलनी परिसरात घडली.

अशोक संपत मेश्राम (वय ५०, रा. पंचशील कॉलनी) असे मृत व्यक्तीचे तर सारंग मेश्राम (वय ३५) असे आरोपीचे नाव आहे. अशोक हा आरोपीचा सख्खा काका आहे. ते शेजारी आहेत. अशोकला दारूचे व्यसन होते. तो चिकन व मटनाच्या दुकानात काम करायचा. सारंगही मटनाच्या दुकानात कामाला होता. दारुच्या व्यसनामुळे अशोकची पत्नी व मुले दोन वर्षांपूर्वी त्याला सोडून गेले. तेव्हापासून तो एकटाच राहतो. अशोकने २०१२ मध्ये सारंगच्या वडिलांना कुऱ्हाडीने मारहाण केली होती. तरीही अशोक सारंगच्या घरीच जेवायचा. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाला. तेव्हापासून सारंगने अशोकला जेवायला दिले नाही. त्यावरून गुरुवारी सकाळी त्यांच्यात वाद झाला. या वादातून अशोक मटनाच्या दुकानात गेला. मला जेवायला का देत नाही, याचा जाब तो सारंगला विचारत होता. यावरून दोघांत भांडण झाले. दुकानातून रात्री घरी परतल्यानंतर अशोक त्याच्या झोपडीत झोपला होता. यावेळी सारंगने लाकडी काठीने त्याच्या डोक्यावर मारून त्याचा खून केला. रात्रभर त्याचा मृतदेह तसाच पडला होता. सकाळी या परिसरातील कामगारांनी अशोकचा मृतदेह बघितला. घटनेची माहिती मिळताच पाचपावली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here