वाचा:
जळगाव शहरातील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी-स्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीत अवसायकाच्या काळात झालेल्या गैरव्यवहाराच्या पुणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुशंगाने नोव्हेंबर महिन्यात पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकून चौकशीला सुरुवात केली होती. बीएचआर पतसंस्थेत अवसायक जितेंद्र कंडारे व व्यावसायिक सुनील झंवरने ठेव पावत्यांचे मॅचिंग, संस्थेच्या मालमत्तांची कवडीमोल दरात विक्री व खरेदी असे व्यवहार करून कोट्यवधींचा अपहार केला. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करताना दोघा चार्टर्ड अकाउंटंटसह चौघांना अटक केली तर गुन्हा दाखल झाल्यापासून अवसायक जितेंद्र कंडारे व सुनिल झंवर पोलिसांच्या हाती आलेले नाहीत.
वाचा:
झंवर महिनाभरापासून पोलिसांना सापडत नाही. मध्यंतरी तो जळगावात येऊन गेल्याची तसेच अटक न होण्यामागे राजकीय दबाव असल्याची चर्चा रंगली होती. असे असताना आर्थिक गुन्हे शाखेचे पथक गेल्या काही दिवसांपासून पुन्हा जळगावात तपासासाठी आले होते. अखेरीस या पथकाने शुक्रवारी सायंकाळी सनील झंवर याचा मुलगा सूरज झंवरला त्याच्या घरातून अटक केल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, या प्रकरणात अटकेत असलेले सीए यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. अन्य संशयित सीए धरम सांखला, विवेक ठाकरे व सुजीत वाणी यांच्या जामीन अर्जावर २७ जानेवारीस सुनावणी होणार आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times