नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या नवीन तीन कृषी काद्यांविरोधात ( ) गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन ( ) सुरू आहे. सरकार आणि शेतकरी यांच्यात १० बैठका झाल्या. पण त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. यावर संरक्षणमंत्री ( ) यांनी आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. नवीन हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत आणि यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात तीन पट वाढ होईल, असं राजनाथ सिंह म्हणाले.

‘करोना व्हायरस एक वर्षापासून असेल तर या काळात कोणतंही विधेयक मंजूर होणार नाही का? सरकारने कोणताही अध्यादेश आणू नये का? सरकार आणि पंतप्रधानांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह लावण्याचं आचित्य काय आहे? संसदेत चर्चा झाली आहे आणि बहुधा अशी अनेक विधेयकं आहेत ज्यावर एकमत झालेलं नाही. विचारांमध्ये मतभेद असतात, असं राजनाथ सिंह म्हणाले.

कृषी कायद्यांवर राजनाथ सिंह म्हणाले…

शेतीबद्दल आपल्याला माहिती आहे. जे विधेयक आहेत आणि कायदे केले आहेत, ते शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न दोन पटीने अधिक वाढेल. तरीही शेतकऱ्यांना समस्या असल्यास कोणत्याही कलमात अडचण असेल तर ते मुद्दे सांगा, आम्ही दुरुस्तीसाठी तयार आहोत, असं राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं.

चीनला स्पष्ट संदेश

एलओसीवरील पाकिस्तानच्या कुरापतींवर त्यांना प्रश्न विचारला गेला. पाकिस्तानचा विषय सोडून द्या. देशाचं नाव पाकिस्तान आहे पण नियंत्रण रेषेवर नापाक कारवाया सुरू असतात. भारताला अस्थिर करण्यासाठी दहशतवाद्यांची मदत घेतली जाते. हा सिलसिला थांबवला पाहिजे. आपले पंतप्रधान दबावापुढे झुकणारे नाहीत. मी संरक्षणमंत्री आहे. दबावापुढे झुकणार नाही. आपल्या प्रियजनांवर झुकलं जातं, असं म्हणत राजनाथ सिंह यांनी चीन, पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here