मुंबई : राज्यात शुक्रवारी २८२ केंद्रांवर २१ हजार ६१० (७६ टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना करोना करण्यात आले. राज्यात सर्वात जास्त जिल्ह्यात १५१ टक्के लसीकरण झाले आहे. त्यापाठोपाठ हिंगोली, अमरावती, वर्धा, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाले आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात असून लसीकरणासाठी झालेल्या नोंदणीनुसार ही टक्केवारी आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे. ( )

वाचा:

शुक्रवारी सायंकाळी सात वाजेपर्यंतची आकडेवारी सरकारने दिली असून काही ठिकाणी लसीकरणाचे सत्र उशिरापर्यंत सुरू राहणार असल्याने अंतिम आकडेवारीत बदल होऊ शकतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात शनिवारी आणि त्यानंतर मंगळवार, बुधवारी आणि आज झालेल्या सत्रांमध्ये आतापर्यंत एकूण ७४ हजार जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांनी दिली. राज्यात कोविशिल्ड सोबतच कोव्हॅक्सिन लसही दिली जात आहे. शुक्रवारी ३१८ जणांना देण्यात आली आहे, असेही व्यास यांनी सांगितले.

वाचा:

शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंतची राज्यातील लसीकरणाची आकडेवारी अशी (कंसात लसीकरण झालेले कर्मचारी आणि टक्के) :

अकोला (२०५, ६८ टक्के), अमरावती (५५७, १११ टक्के), बुलडाणा (२५६, ४३ टक्के), वाशिम (२९८, ९९ टक्के), यवतमाळ (५००, ८३ टक्के), औरंगाबाद (७७२, ७७ टक्के), हिंगोली (२३४, ११७ टक्के), जालना (४३६, १०९ टक्के), परभणी (२४२, ६१ टक्के), कोल्हापूर (७६३, ६९ टक्के), रत्नागिरी (३०९, ६२ टक्के), सांगली (५४५, ६१ टक्के), सिंधुदुर्ग (१९५, ६५ टक्के), बीड (७५७, १५१ टक्के), लातूर (४३९, ७३ टक्के), नांदेड (२९६, ५९ टक्के), उस्मानाबाद (३०९, १०३ टक्के), मुंबई (१३६१, ९१ टक्के), मुंबई उपनगर (२०३०, ८५ टक्के), भंडारा (२६३, ८८ टक्के), चंद्रपूर ( ५३९, ९० टक्के), गडचिरोली (४३९, ९८ टक्के), गोंदिया (२५९, ८६ टक्के), नागपूर (१०२०, ८५ टक्के), वर्धा (६५७, ११० टक्के), अहमदनगर (८१०, ६८ टक्के), धुळे (३७०, ९३ टक्के), जळगाव (५४३, ७८ टक्के), नंदुरबार (३०४, ७६ टक्के), नाशिक (९१६, ७० टक्के), पुणे (१२७५, ४४ टक्के), सातारा (७३५, ८२ टक्के), सोलापूर (५८४, ५३ टक्के), पालघर (३४२, ८६ टक्के), ठाणे (१८०५, ७८ टक्के), रायगड (२४५, ६१ टक्के)

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here