पुणे: ‘लोन अॅप्स’ च्या माध्यमातून कर्ज दिल्यानंतर परतफेड करण्यास उशीर करणाऱ्या नागरिकांच्या मोबाईलमधील डेटा चोरून त्यांना त्रास दिला जात असल्याचे समोर आले आहे. अॅपच्या माध्यमातून मोबाईलमधील चोरलेल्या डेटाचा वापर करून त्यांचे मित्र, नातेवाईक यांना फोन केले जात असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी तीन स्वंतत्र गुन्हे दाखल केले आहेत.

याबाबत घोरपडी परिसरातील एका तरुणीने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सायबर पोलिस ठाण्यात अॅप्समधून फोन करणारे व चालविणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्ररादार तरुणी एका कंपनीत नोकरी करते. लॉकडाऊनमध्ये वडिलांच्या आजारासाठी पैशाची आवश्यकता होती. तिला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्यामध्ये अपच्या माध्यमातून तत्काळ कर्ज मिळेल, असे म्हटले. त्यामुळे महिलेने त्या लिंकवर क्लिक केले. त्या ठिकाणी असणारी सर्व माहिती भरली. ते अप मोबाईलमध्ये इन्स्टॉल होत असताना त्याने मोबाईलचा सर्व डेटा अक्सेस मागितला. त्याला त्यांनी ओके केले. त्यानंतर त्यांना तीन हजार रुपये कर्ज मिळेल, असे दाखविले. त्याला मान्यता दिल्यानंतर सर्व शुल्क कमी होऊन तक्रारदार यांना १७०० रुपये कर्ज मिळाले. ही रक्कम त्यांना सात दिवसांमध्ये भरायची होती. त्यानंतर तक्रारदार यांनी ही कर्ज फेडण्यासाठी वेगवेगळ्यी लोन अॅप्स घेतली. त्याच्या मार्फत त्यांनी कर्ज घेऊन पहिले घेतलेले कर्ज फेडत राहिल्या. डिसेंबर २०२० पर्यंत त्यांना सहा ते सात अॅप्सचे कर्ज परत द्यायचे राहिले होते. त्यावेळी त्या अॅप्समधून बोलत असल्याचे सांगून कर्ज भरण्यासाठी धमकावत होते. त्यांनी कर्ज भरण्यास मदत मागितली. त्यावेळी त्या व्यक्तीने शिवीगाळ करून तुमच्या मोबाईलमधील डेटा आमच्याकडे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्या मोबाईलमधील क्रमांकाची यादीच त्यांना पाठविली. तसेच, गॅलरीमध्ये असलेला त्यांचा फोटा घेऊन त्यावर फ्रॉड असे लिहून त्यांना व त्यांच्या मित्र, नातेवाईकांना पाठविला. तसेच, मित्रांना फोन करून तक्रारदार कर्ज फेडत नसून तुमच्या ओळखीची आहे. त्यामुळे तुम्ही कर्ज भरा, असे धमकावू लागले. या सर्व प्रकारामुळे तक्रारदार यांना खूपच मनस्ताप झाला. याप्रकरणी त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक महादेव कुंभार हे अधिक तपास करत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here