वाचा:
चैतन्यमूर्ती, तेजमूर्ती, स्वाभिमान आणि राष्ट्रीयत्त्वाचे मूर्तिमंत प्रतीक असं फडणवीस यांनी बाळासाहेबांचं वर्णन केलं आहे. बाळासाहेबांच्या काही भाषणांसह स्वत:च्या भाषणांतील काही वाक्येही या व्हिडिओच्या माध्यमातून फडणवीसांनी शेअर केली आहेत. ‘अलीकडच्या राजकारणात नेत्यांची मनं छोटी-छोटी होतात. ते आपल्यापलीकडं पाहू शकत नाहीत. पण बाळासाहेबांचं मन देखील राजासारखं होतं. निवडणूक हरो किंवा जिंको, बाळासाहेब जे चैतन्य निर्माण करायचे ते अप्रतिम होतं. ते येऊन गेले की जिंकल्याची मजा यायची. ही त्यांची ताकद होती,’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
‘जनतेनं विश्वासानं तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही तिकडे जाता? पैशासाठी? पैशाचे लाचार व्हाल तर शिवरायांचं नाव घेऊ नका. भगवा झेंडा हातात ठेवू नका. हे गुण मराठ्यांच्या रक्तात असता कामा नयेत. तुमचं तेज तुम्हाला कायम ठेवलं पाहिजे. तुमच्याकडं आदरानं लोक पाहताहेत तो आदर तसाच ठेवा…’ बाळासाहेबांच्या भाषणातील ही निवडक व सूचक वाक्य फडणवीस यांनी शेअर केली आहेत.
‘आम्ही कुठेही असलो तरी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे आम्हाला आदरस्थानीच राहतील. त्यांच्या विचारांसाठी संघर्ष करत राहू. तुम्ही त्यांच्या विचारांत मिसळ केली असेल, आम्ही नाही केली. बाळासाहेब हे आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होतं,’ अशा शब्दांत फडणवीस यांनी शिवसेनेला टोले हाणले आहेत.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times