नाशिक: तालुक्यातील गावात जबरी चोरीची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी बीअर बार फोडून त्यातील दारूच्या ३० बॉक्ससह सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास केला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात वावी गावात बीअर बार आहे. चोरट्यांनी बीअर बार फोडले. बारमधील दोन लाख ३८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर-शिर्डी मार्गावर वावी येथील बीअर बार चोरट्यांनी फोडले.

दोन ते तीन जण सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत. त्यांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. विदेशी दारूच्या बाटल्या असलेले २५ ते ३० बॉक्स लंपास केले. दोन लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल आणि १४ हजार रुपये किंमतीच्या दोन सायकलीही पळवल्या. ही घटना उघडकीस येताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. सिन्नर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here