नागपूरः ‘भारत बालाकोटवर हल्ला करणार ही माहिती अर्णब गोस्वामीला तीन दिवस आधी कशी कळाली? हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रश्न असून अंत्यत गंभीर बाब असून सीक्रेट अॅक्ट नुसार कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करणारे आहे. याबाबत आम्ही अर्णब यांच्यावर काय कारवाई करता येईल, याबाबत लीगल ओपिनियन मागवलं आहे,’ असं राज्याचे गृहमंत्री यांनी स्पष्ट केलं आहे.

‘ आणि बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्या संभाषणात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. बालाकोटच्या हल्ल्याची माहिती तीन दिवस आधी अर्णबला कशी मिळाली. एखाद्या देश दुसऱ्या देशावर हल्ला करणार असेल तर त्याची माहिती संरक्षण मंत्री आणि तीन- चार महत्त्वाच्या नेत्यांना असते. केंद्रीय नेत्यांनाही याबाबत माहिती दिली जात नाही. मग अर्णब गोस्वामीला ही माहिती कशी मिळाली. त्यावर केंद्र सरकारने उत्तर दिले पाहिजे,’ अशी मागणीही अनिल देशमुख यांनी दिली आहे.

वाचाः

धनंजय मुंडेंवर आरोप राजकीय दबावातून
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्माला राजकीय दबावातून तक्रार करायला लावली होती, असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे. पण, ‘राजकारणाची पोळी भाजण्यासाठी धनंजय मुंडेंवर ज्या पद्धतीने आरोप केले ते चुकीचे होते, आता रेणू शर्मानं याबाबतही स्पष्टीकरण केलं आहे,’ असंही ते म्हणाले आहेत. शिवाय, ‘हा विषय आता संपला आहे,’ असंही त्यांनी नमूद केलं आहे.

वाचाः

जेल पर्यटनाची घोषणा
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जेल पर्यटन या योजनेची आज घोषणा केली आहे. २६ जानेवारी पासून येरवडा कारागृह हे पर्यटनासाठी खुले होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होणार आहे. तसंच, ही योजना महाराष्ट्रातील इतर कारागृहातही राबवण्यात येणार आहे.

‘शाळा, कॉलेज व शैक्षणिक अस्थापना तसंच नोंदणीकृत अशासकीय संस्थाना ही ऐतिहासिक ठिकाणी पाहता यावीत या दृष्टीकोनातून गृह विभागाद्वारे जेल पर्यटन सुरु करण्यात येत आहे,’ असंही गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here