अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना ते करोनावरील लस कधी घेणार, या प्रश्नाचे उत्तर दिले. त्यावेळी आरोग्य कर्मचारी-अधिकारी, पोलीस व अन्य फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात येत आहे. यात मी मोडत नाही. त्यामुळे जेव्हा कधी माझा नंबर येईल तेव्हा मी लगेचच लस घेईन आणि तुम्हाला माहिती देईन, असे अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या उत्तरावर निलेश राणे यांनी ट्विट करत तुम्ही ठरवलं लस घ्यायची आहे तर तुम्हाला थांबवणार कोण?, असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.
‘कोणाची परवानगी घेतली की आपण लस घ्यायला तयार व्हाल अजित पवार साहेब? तुम्ही ठरवलं लस घ्यायची आहे तर तुम्हाला थांबवणार कोण? पवार साहेब वशिला लावून तुमच्यासाठी एक डोस बाजूला काढू शकतात पण नेहमी पळवाट काढणं बरं नव्हे. पवार साहेबांवर तरी विश्वास आहे ना तुमचा?,’ असे सवाल निलेश राणेंनी केले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times