सांगली येथील स्टेशन चौकाला यांचे नाव देण्यात आले. यावेळी जयंतीचाही कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला भिडे उपस्थित होते. देशाला हिंदुस्तान म्हणून जगायचे असल्यास शिवसेनेची गरज आहे आणि हे लक्षात घेऊनच आपण शिवसेनेचे काय वाढवू या. केवळ एका चौकाचे नामकरण करून उपयोगाचे नाही. संपूर्ण देशात शिवसेनेचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाव व्हायला पाहिजे, असेही भिडे पुढे म्हणाले.
संभाजी भिडे पुढे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे यांचे स्वप्न संपूर्ण देशात उभी करण्याचे होते. बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी आपण धडपड करायला हवी. ही धडपड हयात असलेल्या लोकांनी केली पाहिजे. शिवसेनेच्या सांगलीमध्ये दोनशे ते अडीचशे शाखा का नाहीत… शाखा वाढवल्या पाहिजेत. लोकसेवा कायम ठेवून शिवसेनेचा प्रवाह अखंडित ठेवणे गरजेचे आहे. पद असो, पैसा असो किंवा प्रतिष्ठा असो, या सगळ्या गोष्टी शुल्लक आहेत. शिवसेना आणि या पक्षाचा विचार पुढे नेण्यासाठी धडपड करत राहायला हवे. सांगतीतील या चौकाचे नामकरण तर २५ वर्षांपूर्वीच व्हायला हवे होते.
बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि नामकरणाच्या कार्यक्रमाला माजी आमदार नितीन शिंदे, दिनकर पाटील, भाजपचे शेखर इनामदार, प्रसाद रिसवडे, नगरसेविका स्वाती शिंदे इत्यादी नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाला अनेक भाजप नेते आवर्जून उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना संभाजी भिडे यांनी भाजप नेत्यांसमोर शिवसेनेचे तोंड भरून कौतुक केले. आपले हे मत राजकीय नसून ते राष्ट्रीय मत असल्याचेही भिडे म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times