अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (Sharad Pawar) रविवारी (२४ जानेवारी) अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. यासोबतच त्यांच्या उपस्थितीत अकोले तालुक्यात शेतकरी मेळावा होत आहे. ज्येष्ठ नेते (Madhukar Pichad) यांच्या कट्टर विरोधक () यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास पवार महाविकास आघाडीतील नेत्यांसह उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पवारांचा पिचडांच्या मतदारसंघातील हा पहिलाच दौरा असल्याने ते पिचडांसंबंधी काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. मुख्य म्हणजे ज्या कार्यक्रमासाठी पवार येत आहेत, तो कार्यक्रम पूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार होता. मात्र, मधल्या काळात संयोजकांनीच पक्षांतर केल्याने पाहुणेही बदलण्यात आले. (what ncp leader will speak about ?)

पवार यांचे जुने सहकारी मधुकर पिचड यांनी पुत्र वैभव यांच्यासह ऐन निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले पिचड यांचे विरोधक अशोक भांगरे यांनी रविवारचा मेळावा आयोजित केला आहे. त्यामध्ये पवार यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी तसेच शिवसेनेचे पदाधिकारीही आहेत. सध्या नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सुरू आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने या निवडणुकीत उतरण्याचे ठरविले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी पवार काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

पिचडांबद्दल पवार काय बोलणार?
मुख्य म्हणजे ऐनवेळी धोका दिलेल्या पिचडांबद्दल पवार काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतप पिचडांनी पवार यांच्याविरोधात नरमाईची भूमिका घेतली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार यांच्यावर वैयक्तिक टीका केली, त्यावेळी पिचड-पिता पुत्रांनी पवार यांची बाजू घेत पडळकर चुकीचे बोलत असल्याचे म्हटले होते. ‘देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या नेतृत्वावर अतिशय छोट्या माणसांनी टीका करणे योग्य नाही. मी राजकारणातून निवृत्त झालो असलो तरी अशा घटनांनी मन व्यथित होते,’ असे त्यावेळी पिचड म्हणाले होते.

क्लिक करा आणि वाचा-
असे असले तरीही ऐन निवडणुकीत पिचडांनी दिलेला धोका पवार यांच्या जिव्हारी लागला आहे. तर दुसरीकडे पवार यांच्या राष्ट्रवादीला अकोले तालुक्यात पर्यायी नेते मिळाल्याने त्यांना ताकद देण्याचे काम पवार यांच्याकडून सुरू झाले आहे. अकोले तालुक्यातील माजी आमदार कै.य शवंतराव भांगरे यांच्या ३९ व्या पुण्यातिथीनिमित्त त्यांच्या पूर्णकर्ती पुतळ्याचे अनावरण पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दोन वर्षांपूर्वीच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार होता. मात्र त्यावेळी कार्यक्रम अचानक रद्द झाला होता. मधल्या काळात विधानसभा निवडणूक आली. त्यात पक्षांतर होऊन पिचड भाजपमध्ये तर भांगरे राष्ट्रवादीत आले. त्यामुळे आता पवार यांच्या हस्ते हा कार्यक्रम होत आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here