सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी माजी मुख्यमंत्री आणि यांच्यावर मोठा आरोप करत राजकीय महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना मला भाजपाकडून पक्षात प्रवेश करण्यासाठी १०० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोटच आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. इतकेच नाही, तर भाजपा-शिवसेना युतीचं सरकार राज्यात असताना अनेक नेत्यांना भाजपाकडून ऑफर देण्यात आल्या होत्या, असा खळबळजनक दावा शिंदे यांनी केला आहे.

शशिकांत शिंदे आज शनिवारी साताऱ्यामध्ये पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी हा खळबळजनक दावा केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी विविध माध्यमातून माझ्याशी संपर्क साधला होता. जर मी भाजपामध्ये प्रवेश केला तर मला मंत्रिपद देण्यात येईल असे आश्वासन ते मला देत होते. इतकेच नाही, तर मला निवडून आणण्यासाठी पोटनिवडणुकीत भाजप १०० कोटी रुपये खर्च करेल, असेही आपल्याला सांगण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यावेळी भाजपने देऊ केलेली ती ऑफर मी नाकारली. भविष्यातही अशी ऑफर मी नाकारतच राहीन, असे शिंदे पुढे म्हणाले. उदयनराजे भोसले भाजपात जात असतानाही मला ऑफर देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांमध्ये शशिकांत शिंदे हे साताऱ्यातील वजनदार नेते म्हणून ओळखले जातात. ते मुंबई तसेच नवी मुंबईतील माथाडी कामगारांचे नेते म्हणून कार्यरत आहेत. पवार कुटुंबीयांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या शिंदे यांचा साताऱ्यातील राजकारणात मोठा दबदबा आहे. कोरेगाव मतदारसंघातून ते दोन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. मात्र, सन २०१९ मध्ये त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना विधान परिषदेत पाठवले.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here