आकाशची आई सुप्रिया जयराम जाधव यांना सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी बीकेसी वांद्रे येथील पोलिस उपायुक्त मंजूनाथ शिंगे यांच्या कार्यालयात सूपुर्द करण्यात आला.
आकाश जाधवच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी, गेले दिड महिना संघर्ष करणारे जातीअंत संघर्ष समितीचे कॉम्रेड सुबोध मोरे, कॉ.शैलेंद्र कांबळे, बौद्धजन पंचायत समितीचे लक्ष्मण भगत, गट प्रतिनिधी गणेश खैरे, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक २३४ चे सर्व प्रमुख कार्यकर्ते व वस्तीतील लढाऊ महिला यांनी लढा उभारला होता. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी १८ जानेवारीला वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध धरणे आंदोलनही करण्यात आले होते. त्यावेळी पीडित कुटुंबाला दोन दिवसांत न्याय मिळेल असे आश्वासन निवासी जिल्हाधिकारी विकास नाईक यांनी आंदोलनाच्या शिष्टमंडळाला दिले होते.
क्लिक करा आणि वाचा-
खून प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाटच
पीडित कुटुंबाला मिळाली असली, तरी देखील या खून प्रकरणातील आरोपी अजून मोकाटच आहेत. त्या सर्व आरोपींनाही त्वरित अटक करण्यासाठीही जिल्हाधिकारी व पोलीसांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना करीत आहेत. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांना खुले पत्रही लिहिले आहे, अशी माहिती जातीअंत संघर्ष समितीचे सुबोध मोरे आणि शैलेंद्र कांबळे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times