मुंबईः आज राज्यात ५६ करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ३ हजार ६९४ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५. २२ टक्के इतके झाले आहे. ()

राज्यात करोना लसीकरण मोहिमेला राज्यात वेग आला असतानाच करोना रुग्णवाढीला देखील ब्रेक मिळाला आहे. करोना संसर्गाचे दैनंदिन आकडेही दिलासा देणारे आहेत. राज्यातील करोना रुग्णांचे प्रमाण वेगाने घट होत असून रिकव्हरी रेट वाढत आहे. करोना मृतांचा आकडाही कमी झाला आहे.

आरोग्य विभागानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात करोनानं आणखी ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं मृतांची एकूण संख्या ५० हजार ७४० इतकी झाली असून राज्यातील करोना मृत्यूदर आता २.५३% इतका झाला आहे. राज्यात आज २ हजार ६९७ नवीन रुग्णांची भर पडली असून राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या २० लाख ०६ हजार ३५४ इतकी झाली आहे. तर, करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १९ लाख १० हजार ५२१ इतकी झाली आहे. जपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४१,४५,८२९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,०६,३५४ (१४.१८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात करोना बाधित रुग्णांचा आकडा वेगानं खाली येत असताना राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्यांही कमी होत आहे. सध्या राज्यात फक्त ४३ हजार ८७० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत सध्या ६ हजार ३६२ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत तर, पुण्यात सर्वाधिक ११ हजार ५१५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात २,१३,६७८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,९९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here