‘कार्यक्रमाला बोलावून अपमान करू नका’
हा सरकारी कार्यक्रम आहे आणि त्याचा सन्मान ठेवला पाहिजे. हा कुठल्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही. आणि कार्यक्रमाला बोलावून अशा प्रकारने कुणाचा अपमान तुम्ही करू शकत नाही. या घोषणाबाजीचा मी निषेध करते आणि काहीच बोलणार नाही, असं म्हणत ममता बॅनर्जींनी संताप व्यक्त केला.
कोलकाता येथील ऐतिहासिक व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ममता बॅनर्जींच्या भाषणावेळी ‘जय श्रीराम’ची घोषणाबाजी केल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां यांनी ट्विट केलं. नुसरत जहां यांनी राजकीय आणि धार्मिक नारेबाजीचा निषेध केला. सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या नेत्याने छळाविरोधात लढायला शिकवलं. स्वातंत्र्यासाठी नेताजींचे योगदान मोठे आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त नमन करते, असं नुसरत जहां म्हणाल्या.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times