मुंबई- बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल कॉंग्रेसची खासदार हिची राजस्थान ट्रिप नुकतीच चर्चेत आली होती. या ट्रीपला ती अभिनेता यश दासगुप्तासोबत गेली होती. यानंतरच ती आणि नुसरतचा नवरा यांच्यात दुरावा आल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता स्वतः निखिल हिमाचलच्या ट्रीपला एकटा गेला आहे. त्याच्या पोस्टने आणि इन्स्टा स्टेटसने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अभिनेता यश याला डेट करत असल्याच्या बातम्या आल्या

गेल्या काही दिवसांपासून नुसरत जहां आणि तिचा नवरा निखिल जैन यांच्यात सर्वकाही सुरळीत नसल्याच्या बातम्या सातत्याने येत होत्या. नुसरत आणि अभिनेता यश दासगुप्ता यांची वाढती जवळीक याला कारण असल्याचं बोललं जात आहे. हे कमी की काय काही दिवसांपूर्वी नुसरत यशसोबतच राजस्थानच्या ट्रीपला गेली होती. यानंतर नुसरतने या सर्व गोष्टींवर आपली प्रतिक्रिया देत तिला स्वतःच्या खासगी गोष्टींबद्दल फारसं बोलायचं नाही असं स्पष्ट सांगितलं होतं.

त्याचवेळी यशने राजस्थान ट्रिपवर कोणीही जाऊ शकतं असंही उत्तर दिलं होतं. त्याला नुसरतच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहीत नसल्याचं सांगत, तिच्या आयुष्याबद्दल तिलाच विचारला असंही म्हणाला होता. आता निखिल जैन हिमाचलमध्ये निवांत क्षण एन्जॉय करत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याच्यासोबत नुसरत दिसत नाही. निखिलच्या एका फॉलोवरने आपलं मत व्यक्त करताना लिहिले की, ‘तू एक चांगला व्यक्ती आहेस. तिला नक्कीच पश्चाताप होईल.’

हिमालयात जास्तीत जास्त वेळ घालवतोय निखिल जैन

निखिल जैन याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ‘दिल तोड़के हंसती हो मेरा’ हे गाणं शेअर केलं होतं. त्याच्या प्रत्येक फोटोसोबत तो काही मतितार्थ असलेली वाक्यही शेअर करत असतो. तसेच काही फोटोंवर प्रेरणादायी संदेशही असतात. सध्या निखिल पर्वतांवर आपला वेळ घालवत आहे. तो नुसरतसोबतचे फार कमी फोटो सोशलवर शेअर करत आहे. नुसरतसोबतचा शेवटचा फोटो त्याने २१ ऑक्टोबर महिन्यात शेअर केला होता. दुसरीकडे नुसरत तिच्या व्यावसायिक कामांमध्ये व्यग्र आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here