मीडिया रिपोर्टनुसार, लवकरच बेअर ग्रिल्ससोबत एका विशेष भागाचं चित्रीकरण करणार आहेत. मोदींसोबतचा भाग उत्तराखंड येथील जिम कॉर्बेट पार्कमध्ये चित्रीत करण्यात आला होता. तर रजनीकांत यांच्यासोबतच चित्रीकरण कर्नाटक येथील बांदीपुर टायगर रिझर्व्हमध्ये करण्यात येईल. चैन्नई येथील पत्रकार शब्बीर अहमद यांनी ट्वीट करून याबद्दलची माहिती दिली.
भारतातील सर्वात यशस्वी कलाकारांच्या मांदीयाळीत रजनीकांत यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं. त्यांनी तमिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. नुकताच त्यांचा ‘दरबार’ सिनेमा प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगली कमाई केली. यानंतर रजनीकांत ‘थलाइवार १६८’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
वन विभागाने लागू केले अटी आणि नियम-
दरम्यान, कर्नाटक वन विभागाने चित्रीकरणासाठी परवानगी दिली असली तरी अनेक अटी आणि नियम लागू केले आहेत. काल पासून चित्रीकरण सुरू झालं असून २७ जानेवारीला अर्धा दिवस, आज २८ जानेवारीला सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आणि उद्या २९ जानेवारीला अर्धा दिवस चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times