एल्गार परिषदेला परवानगी मिळावी यासाठी कोळसे पाटील यांनी स्वारगेट पोलिसांकडे अर्ज केला होता. मात्र, करोनाचे संकट पाहता एल्गार परिषदेला परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर जर एल्गार परिषदेला परवानगी नाकारण्यात आली, तर आम्ही आमची रस्त्यावर भरवू, नाहीतर मग जेलभरो आंदोलन करू असा इशारा बी. जी. कोळसे पाटील यांनी दिला होता.
या पूर्वी ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवारवाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद वादग्रस्त ठरली होती. या परिषदेच्या दुसऱ्याच दिवशी, १ जानेवारी २०१८ या दिवशी कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला होता. पोलिसांनी या परिषदेचा संबंध कोरेगावच्या हिंसाचाराशी जोडला होता.
क्लिक करा आणि वाचा-
मात्र, आता तीन वर्षांनंतर पुन्हा एल्गार परिषदेला पोलिसांनी परवानगी दिल्यामुळे आता ही परिषद ३० जानेवारी या दिवशी गणेश कला क्रीडा मंच येथे होत आहे. करोना असल्यामुळे या परिषदेला २०० जणांनाच सहभाग घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times