सुमारे १०० किलोमीटर ट्रॅक्टर परेड काढण्यात येईल. परेडसाठी लागणारा वेळ आम्हाला देण्यात आला आहे. ही ऐतिहासिक परेड असेल आणि ती संपूर्ण जग बघेल. परेडचा पूर्ण मार्ग आणि वेळ याबद्दल उद्या माहिती दिली जाईल, असं पोलिस आणि शेतकरी नेत्यांच्या बैठकीनंतर शेतकरी नेते दर्शन पाल म्हणाले.
शेतकऱ्यांनी आम्हाला अद्याप कोणताही लेखी मार्ग दिलेला नाही. लेखी मार्ग दिल्यानंतर त्यावर माहिती देऊ, असं दिल्लीच्या पोलिस आयुक्तांनी सांगितलं.
शेतकरी संघटना २६ जानेवारीला दिल्लीत ट्रॅक्टर परेड काढण्यावर ठाम होते. पण दिल्ली पोलिसांनी ही परेड रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रॅलीबाबत निर्णय घ्यावा, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं.
दिल्ली- एनसीआरमधील ट्रॅक्टर परेडमध्ये भाग घेण्यासाठी बर्याच राज्यांतील शेतकरी दिल्लीत येत आहेत. २४ जानेवारीला भिवानी जिल्ह्यातील पाच हजार ट्रॅक्टर प्रस्तावित शेतकरी ट्रॅक्टर परेडमध्ये भाग घेण्यासाठी दिल्लीला रवाना होतील, असा दावा भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) नेते जोगेंद्र तालू यांनी शनिवारी केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times