LAC पासून ते LOC पर्यंत संपूर्ण जग हे शक्तिशाली भारताचा अवतार बघतंय. हा भारत नेताजींनी आपल्या दूरदृष्टीतून बघितला होता. आता भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा किंवा हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांना ताकदीने प्रत्युत्तर देतोय, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोलकाता दौऱ्याकडे पश्चिम बंगालमधील निवडणुकांना जोडून पाहिलं जात आहे. कोलकातात पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी नॅशनल लायब्ररीला भेट दिली तिथे नेताजींच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यानंतर त्यांनी नेताजी भवनला भेट दिली. नेताजींबद्दलची माहिती या ठिकाणी दिली गेली. यानंतर पंतप्रधान मोदी हे कोलकात्यातील प्रसिद्ध व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये पोहोचले. या ठिकाणी पंतप्रधान मोदींनी सभेला संबोधित केलं. पण यावेळी कुठलंही राजकीय भाष्य केलं नाही.
नेताजींनी आजचा भारत बघितला असता तर त्यांना गर्व झाला असता. आजचा भारत स्वतःची लस तयार करण्यास सक्षम आहे. एवढचं नव्हे तर शेजारील देशांनाही लसचा पुरवठा करत आहे. भारताचे शास्त्रज्ञ लस निर्मिती करण्यात सक्षम आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
गरीबी, निरक्षरता, रोगराई देशासमोरच्या मोठ्या समस्या आहेत, असं नेताजी म्हणाले. समाज एकजूट झाल्यास या सर्व समस्या दूर होऊ शकतात, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. पश्चिम बंगालमधील महापुरुषांना प्रणाम केला. नेताजींच्या सारख्या महान सुपुत्रा जन्म देणाऱ्या मातेला मोदींनी नमन केलं. तसंच हावडा-कालका मेलचं नाव बदलून आता नेताजी एक्स्प्रेस करण्यात आल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times