त्याने काल ( शुक्रवारी ) राय पोलिस स्टेशनचे एसएचओ प्रदीप यांनी हत्येची जबाबदारी दिल्याचा दावा केला. पण त्या पोलिस ठाण्यातच काय जिल्ह्यातही अशा नावाचा एकही एसएचओ नाही, हे आमच्या तपासात उघड झाले आहे. संशयित आरोपी हा सोनीपतचा राहणारा आहे, त्याचे वडील एक स्वयंपाकी असून आई घरकाम काम करते. हा संशयित एका कारखान्यात काम करत होता.
लॉकडाउननंतर त्याला कारखान्यातून काढून टाकण्यात आले होते आणि तो बेरोजगार आहे. विनयभंगाच्या आरोपावरून शेतकऱ्यांच्या व्हॉलेंटिअर्सशी त्याची झटापट झाली होती. एका कॅम्पमध्ये नेऊन त्याला मारहाण करण्यात आली होती. भीतीपोटी हा दावा केल्याचं त्याचं म्हणणं आहे. त्या व्यक्तीविरूद्ध कोणताही गुन्हा नोंदवल्याचं आढळलेलं नाही. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
लँडलाइन फोनवरून आपल्याला सूचना दिल्या जात होत्या. पण तपासात असं काहीही समोर आलेलं नाही. करनाल येथील मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या सभेतही तो उपस्थित होता, असं सांगितलं जात असल्याचं पोलिस म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times