नवी दिल्लीः तामिळनाडूमधील विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस नेते ( ) यांनी शनिवारी प्रचाराचा नारळ फोडला. तिरुपूरमधील जनतेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी ( ) सरकारसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही ( ) लक्ष्य केलं. आरएसएसमध्ये सुरुवातीपासूनच महिलांशी भेदभाव केला जात होता. ते महिलांचा आदर करत नाहीत. आदर केला असता तर त्यांनी महिलांचा संघटनेत समावेश केला असता. दुर्दैवाने देशावर नियंत्रण ठेवणारी ही संघटना फॅसिस्ट, पुरुषवादी आहे’, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

‘जनतेसंबंधीत प्रत्येक गोष्ट मोदी विकताहेत’

तामिळनाडूमध्ये एप्रिल-मे महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी तीन दिवसांच्या तामिळनाडू दौर्‍यावर आहेत. त्यांनी प्रचाराची सुरुवात कोईंबतूरमधील रोड शोने केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं. ‘नरेंद्र मोदी एक एक करून देशातील जनतेशी संबंधित असलेली प्रत्येक वस्तू विकत आहेत. मोदींनी बड्या उद्योजकांशी भागीदारी केली आणि जनतेच्या मालकीचं सर्व काही विकत आहेत’, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

‘सत्तेत आल्यावर जीएसटी बदलणार’

व्यापाऱ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी जीएसटीचा मुद्दा उपस्थित केला. आम्ही सत्तेत आल्यावर जीएसटीची पुनर्रचना करू. मोदी सरकारने जीएसटीची योग्यप्रकारे अंमलबजावणी केली नाही. जीडीपीमधील घसरणीचं एक प्रमुख कारण जीएसटीचे अपयश असल्याचा दावा राहुल गांधींनी केला.

१० दिवसांत दुऱ्यांदा दौरा

तामिळनाडूत दाखल झालेले राहुल वायनाडचे खासदार आहेत. १० दिवसांत दुसऱ्यांदा त्यांचा तामिळनाडूचा दौरा आहे. यापूर्वी १४ जानेवारीला पोंगल येथील पारंपरिक जल्लीकट्टू शर्यत पाहण्यासाठी ते मदुराईला आले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here