गुवाहाटी, आसामः केंद्रीय गृहमंत्री यांनी ( ) शनिवारी गुवाहाटीमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांसाठी (CAPF) आयुष्मान सीएपीएफ योजनेची ( ) घोषणा केली. आता त्यांना केंद्रीय आरोग्य विमा कार्यक्रमांचा लाभ मिळेल. या योजनेच्या माध्यमातून देशातील २४ हजार रुग्णालयांमध्ये सुमारे १० लाख केंद्रीय सैन्य दलाच्या जवानांना मोफत उपचार मिळू शकतील. त्यांच्या ५० लाख कुटुंबीयांनाही याचा लाभ मिळणार आहे.

‘आयुष्मान सीएपीएफ योजना सुरू करण्यासाठी सीएपीएफच्या सर्व जवान आणि त्यांच्या कुटुंबासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचा आजचा चांगला दिवस आहे. ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा’ अशी घोषणा देऊन त्यांनी तरुणांमध्ये जोश भरला होता, असं शहा म्हणाले.

कार्ड स्वॅपिंगद्वारे उपचार घेता येणार

‘करोनाविरूद्धच्या लढाईत सीएपीएफचे जवान आघाडीवर उभे होते. यावेळी अनेक जवानांना करोनाचा संसर्ग झाला. अनेकांनी आपला जीवही गमावला. या लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या सर्व जवानांचं अभिनंदन करतो. या योजनेतून सीएपीएफच्या जवानांना उपचारासाठी हॉस्पिटल्समध्ये फक्त कार्ड स्वॅप करावं लागेल, अशी माहिती शहांनी दिली.

सुरक्षा दलांचा समावेश पीएम-जेवायवायमध्ये करण्यात येईल

सीएपीएफ, आसाम रायफल्स, राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (एनएसजी) चे २८ लाख कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेत (एबी पीएम-जेएवाय). समावेश करण्यात येईल, असं अमित शहांनी सांगितलं. शाह यांच्यासोबत आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय आणि आसामचे आरोग्यमंत्री हिमंता विश्व सरमा उपस्थित होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here