म. टा. विशेष प्रतिनिधी,

मुंबई महापालिकेच्या वतीने दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट्‌‌स या इमारतीसमोर डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये शिवसेनाप्रमुख यांचा उभारण्यात आलेला हा पहिलाच भव्य पुतळा आहे. या पुळ्याची उंची नऊ फूट असून, १२०० किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे.

प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली असून, ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकारला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्कच्या मैदानावर त्यांचे दसरा मेळाव्यातील भाषण हा शिवसेनेच्या राजकीय वाटचालीतील ऐतिहासिक आणि महत्त्वाचा टप्पा आहे. शिवसेनाप्रमुखांची अमोघ वाणी हेच त्‍यांचे ब्रह्मास्‍त्र होते. बाळासाहेब सभेला संबोधित करायला सुरुवात करायचे, त्या वेळी त्‍यांची जशी मुद्रा असायची तशीच मुद्रा या पुतळ्याची आहे. दोन्ही हात उंचावून जनतेला संबोधित करतानाच्या मुद्रेत बाळासाहेबांचा पुतळा आहे. शिवसेनाप्रमुख ज्‍या वाक्‍यांनी सभेला सुरुवात करायचे ती, ‘जमलेल्‍या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ ही वाक्‍येही पुतळ्याखाली कोरण्यात आली आहेत.

१४ महिन्यांनी भेट

आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू जवळपास १४ महिन्यानंतर एकाच व्यासपीठावर आलेले या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहायला मिळाले. या संपूर्ण कार्यक्रमात हे दोघेही पूर्णवेळ एकत्र होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर या दोघांनीही पुतळ्याची माहिती घेतानाच पुतळ्यातील छोट्या छोट्या बारकाव्यांवरही चर्चा केल्याचे दिसले. उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून राज यांना पुतळ्याबाबत काही माहिती दिल्याचे पाहायला मिळाले.

राज यांची समयसूचकता

गर्दीत उभ्या असलेल्या अमित ठाकरे यांना राज यांनी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी बोलावले. त्यानंतर अमित यांनी पुष्प अर्पण करून बाळासाहेबांना अभिवादन केले. त्यानंतर ते सहजरित्या व्यासपीठावर असलेल्या दिग्गज नेत्यांच्या बाजूला येऊन उभे राहिले. राज यांच्या हे लक्षात येताच त्यांनी लगेचच अमित यांना तिथून बाजूला जाण्याबाबत खुणावले. अमित ठाकरेही लगेचच तिथून बाजूला झाले आणि ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या बाजूला जाऊन उभे राहिले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here