मुंबई: मुंबईतील लसीकरण मोहिमेला (Vaccination Campaign) आता आणखी वेग येणार असून पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या आणखी सव्वालाख मुंबई महानगरपालिकेला () उपलब्ध झाला आहे. मुंबईत लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. (the corona in mumbai is set to gain momentum)

१५ जानेवारी या दिवशी पुण्याहून १ लाख ३९ हजार ५०० लशींचा साठा मुंबईत आणण्यात आला. तर गुरुवारी रात्री १ लाख २५ हजार लशींचा साठा मुंबईत आणण्यात आला. हे पाहता मुंबई महापालिकेला आतापर्यंत एकूण २ लाख ६४ हजार ५०० लशींचा साठा उपलब्ध झालेला आहे. नव्याने उपलब्ध झालेल्या लशीची साठवणूक परळच्या एफ दक्षिण विभागात करण्यात आली आहे.

कोविन अॅपवर नाव नोंदणी करण्यात आलेल्या १ लाख २५ हजार कर्मचाऱ्यांना लशीचा पहिला डोस देण्यात येत आहे. यासाठी गेल्या १५ जानेवारी या दिवशी १ लाख ३९ हजार ५०० लशीच्या डोसचा साठा मुंबईत दाखल झाला. आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जाणार आहे. दररोज ४ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना डोस देण्याची महापालिकेची तयारी आहे.

१६ जानेवारीपासून आतापर्यंत १३ हजार ३६५ आरोग्य सेवकांना डोस देण्यात आलेले आहेत. अजूनही आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी सुरू आहे. सुरुवातीला लस घेण्यासाठी ५० टक्केच कर्मचारी हजर राहत होते. यामुळे मोहिमेचा उद्देशालाच हरताळ फासला जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. आता मात्र कर्मचारी उत्तम प्रतिसाद देत आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
लसीकरणाचा दुसरा टप्पाही महत्वाचा असून या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना डोस दिले जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी पोलिस आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या नावाची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी आतापर्यंत १ लाख ७० हजार कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर लवकरच दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here