मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर ”च्या घोषणा देणं ‘अंगावर येणाऱ्या वळूला लाल कपडा दाखवण्यासारखं आहे’, असं अनिल वीज यांनी म्हटलंय.
यावर, ‘अंगावर येणाऱ्या वळूला लाल कपडा दाखवण्यासारखं आहे. हेच कारण आहे की त्यांनी व्हिक्टोरिया मेमोरियलम्ये आपलं भाषण थांबवलं’, असं ट्विट अनिल वीज यांनी केलंय.
नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाषणासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. परंतु, मुख्यमंत्री माईकपाशी येत असतानाच स्टेजच्या जवळ बसलेल्या काही लोकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. त्यानंतर ममता बॅनर्जी चांगल्याच संतापल्या होत्या.
‘हा सरकारी कार्यक्रम आहे आणि त्याचा सन्मान ठेवला पाहिजे. हा कुठल्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सांस्कृतिक मंत्रालयाची आभारी आहे की त्यांनी कोलकातामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं. परंतु, कुणाला कार्यक्रमाला निमंत्रित करून त्याचा अपमान करणं तुम्हाला शोभत नाही. या घोषणाबाजीचा मी निषेध करते आणि काहीच बोलणार नाही… जय हिंद, जय बांगला’ असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी आपला निषेध नोंदवला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times