मुंबई : करोना प्रतिबंधात्मक लसीकरण आणि अमेरिकेतील बायडन सरकारच्या धडाकेबाज कार्यक्रमांनी अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याला गती मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीमधील गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे. आज शुक्रवारी सोने दरात ३०० रुपयांची घसरण झाली असून चांदीमध्ये तब्बल १००० रुपयांची घसरण झाली आहे.

सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४९१६७ रुपये आहे. त्यात २८१ रुपयांची घसरण झाली आहे. त्याआधी तो ४९११० रुपयांपर्यंत खाली आला होता. ६६२०९ रुपये असून त्यात १०९१ रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचा भाव ६५९२५ रुपयांपर्यंत खाली घसरला होता.जागतिक बाजारात स्पॉट गोल्डचा भाव ०.३ टक्क्यांनी कमी झाला आणि तो १८६३.५६ डॉलर प्रती औंस झाला. चांदीचा भाव प्रती औंस २५.८५ डॉलर आहे.

good returns या वेबसाईटनुसार आज शुक्रवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८५५० रुपये झाला आहे. त्यात ५० रुपयांची घसरण झाली. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९५५० रुपये झाला आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८२५० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५२६३० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४६६४० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५०८८० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८१७० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५०८७० रुपये आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर जो बायडन यांनी कामाचा धडाका सुरू केला आहे. बायडन यांनी ट्रम्प यांच्या काळातील निर्णय मागे घेतले आहेत.बायडन यांनी सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर १५ कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली आहे. हे आदेश म्हणजे ट्रम्प यांनी केलेल्या नुकसानीची भरपाई असल्याचे बायडन यांच्या टीमकडून सांगण्यात आले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here