मुंबई: शिवसेनाप्रमुख () यांच्या स्मृतींना उजाळा देताना शिवसेनेचे खासदार (Sanjay Raut) यांनी केंद्रातील मोदी सरकारला टोला लगावला आहे. ‘बेताल राज्यकर्त्यांना वेसण घालण्यासाठी आज बाळासाहेब ठाकरे हवे होते. हम करे सो कायदा ही प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी बाळासाहेब हवेच होते, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडले आहे. (shiv sena mp slams modi government indirectly)

‘…आणि गर्भगळीत झाले’

खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरातून बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. ते पुढे म्हणतात, ‘काश्मिरातील अतिरेक संपलेला नाही. पण माझ्या शिवसैनिकांच्या हातात एके-४७ द्या, काश्मिरातील दहशतवाद संपवून दाखवतो, असे ठणकावणारे बाळासाहेब आज हवे होते. अमरनाथ यात्रा होऊ देणार नाही अशी ‘गिधड’ धमकी देताच केंद्र सरकार गर्भगळीत झाले, पण मुंबईतल्या हिंदुहृदयसम्राटाने उलटखाती त्या धमकीच्या ठिकऱ्या उडवत गर्जना केली. अमरनाथ यात्रा होणारच, एका जरी यात्रेकरूच्या केसाला धक्का लागला तर याद राखा. हजला जाणारे एकही विमान उडू देणार नाही, असे ठणकावताच अतिरेक्यांचा मामला थंड झाल्याची आठवण राऊत यांनी ताजी केली.

क्लिक करा आणि वाचा बातमी-

आंदोलक शेतकऱ्यांनाही वाटत असेल ‘बाळासाहेब हवे होते.’

आज ते बाळासाहेब हवे होते, असे दिल्लीच्या सीमेवर ५० दिवसांपासून थंडीवाऱ्यात लढा देणाऱ्या शेतकऱ्यांनाही वाटत असेल, असे नमूद करतानाच शेतकऱ्यांच्या बाजूने बाळासाहेबांनी एकच गर्जना करून अहंकारी सरकारला सळो की पळो करून सोडले असते, असे राऊत म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा बातमी- क्लिक करा आणि वाचा बातमी-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here