दरवर्षी अर्थ मंत्रालयाच्या नॉर्थ ब्लॉक इमारतीतील तळघरात अर्थसंकल्पाच्या छपाईची प्रक्रिया पार पडली जाते. छपाईच्या कामाचा शुभारंभ अर्थ खात्यातील कर्मचाऱ्यांचे तोंड गोड करून केला जातो. छपाई आरंभी मोठ्या कढईत हलवा तयार केला जातो. अर्थमंत्री आणि त्यांचे सर्व सहकारी या सोहळ्याला उपस्थित असतात. तो हलवा नंतर सर्वाना वाटून तोंड गोड केले जाते. त्यानंतर अर्थसंकल्पाच्या प्रतींची छपाई केली जाते. यंदा मात्र बजेटची मोजकी छपाई केली जाणार आहे. काटकरस म्हणून सरसकट बजेटच्या हजारो प्रती न छापण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. त्यामुळे होणार की नाही याबाबत साशंकता होती. याच धर्तीवर कर सवलती मिळण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी दरवर्षी प्रथेनुसार हा हलवा सोहळा पार पाडतो. केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री यांच्या उपस्थितीत २०२१-२२ च्या केंद्रीय तयार करण्याच्या अंतिम टप्प्याचा चिन्हांकित हलवा सोहळा शनिवारी दुपारी नॉर्थ ब्लॉकमध्ये पार पडला. यावेळी अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमन यांनी संसद सदस्यांना आणि सर्वसामान्यांना बजेटशी संबंधित कागदपत्रे सहज व वेगवान मिळवून देण्यासाठी “केंद्रीय अर्थसंकल्प मोबाइल अॅप” सुरू केले.
वाचा :
हलवा समारंभास, केंद्रिय अर्थमंत्र्यांसमवेत केद्रिय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी अर्थ मंत्रालयातील विविध सचिव उपस्थित होते. अर्थसंकल्पीय तयारी आणि संकलन प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्ये इतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासमवेत यावेळी उपस्थित होते.
मोबाइल अॅपमधून मिळणार ‘बजेट’चे अपडेट
– अर्थसंकल्प यंदा प्रथमच पेपरलेस स्वरूपात देण्यात येणार आहे.
– अर्थसंकल्पाशी संबंधित सर्व १४ दस्त मोबाइल अॅपमध्ये उपलब्ध केली जाणार आहेत. याअंतर्गत, वार्षिक वित्तीय विवरण (सामान्यत: अर्थसंकल्प म्हणून ओळखले जाते), अनुदान मागणी (डीजी), वित्त विधेयक इत्यादी दस्त उपलब्ध असतील जी घटनेनुसार निश्चित केली गेली आहेत.
– अॅप्लिकेशनमध्ये डाऊनलोड, मुद्रण, सर्चिंग, झूम इन आणि आऊट, स्क्रोलिंग, सारणीचे विषय यादी, आणि एक्स्टर्नल लिंक आदी वैशिष्ट्यांसह वापरकर्त्यासाठी अतिशय अनुकूल आहे.
-हे दोन भाषांमध्ये (इंग्रजी आणि हिंदी) आहे आणि अंड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.
-हे अप्लिकेशन केंद्रिय अर्थसंकल्पाच्या पोर्टलवरून देखील (www.indiabudget.gov.in) डाऊललोड करण्यासाठी उपलब्ध आहे.
-१ फेब्रुवारी २०२१ रोजी संसदेमध्ये अर्थमंत्र्यांचे भाषण संपल्यानंतर अर्थसंकल्पाची कागदपत्रे मोबाईल अप्लिकेशनवर उपलब्ध असतील.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times