मराठी सिनेसृष्टीतील क्युट कपल म्हणून सिद्धार्थ आणि मिताली ओळख आहे. त्यांच्या या विवाहसोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर आज दोघंही लग्नाच्या बेडीत अडकले. पुण्यातील ढेपे वाड्यात सिद्धार्थ आणि मिताली विवाहबद्ध झाले. या लग्नाला मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. अभिनेत्री अभिज्ञा भावे तिच्या पतीसोबत या विवाबसोहळ्यात सहभागी झाली होती. तर पूजा सावंत, भूषण प्रधान हे देखील सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नाला आले होते.
पारंपारिक मराठमोळ्या पद्धतीनं सिद्धार्थ-मितालीचा विवाह पार पडला. मितालीनं हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती, तर सिद्धार्थनं निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.
दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंन्टाइन्स डेच्या दिवशी सोशल मीडियावर सिद्धार्थ आणि मिताली यांनी प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर दोघांचा साखरपुडा पार पडला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times